360 अंशात स्क्रीन वळवणारा... 'लेनोवो योगा 300'!

मोबाईल आणि लॅपटॉप निर्माता कंपनी लेनोवोनं आपला नवीन लॅपटॉप 'लेनोवो योगा 300' लॉन्च केलाय. सडपातळ, हलका, टचस्क्रीन आणि कन्व्हर्टेबल असा हा मल्टिपर्पज लॅपटॉप आहे. 

Updated: Oct 21, 2015, 03:32 PM IST
360 अंशात स्क्रीन वळवणारा... 'लेनोवो योगा 300'! title=

मुंबई : मोबाईल आणि लॅपटॉप निर्माता कंपनी लेनोवोनं आपला नवीन लॅपटॉप 'लेनोवो योगा 300' लॉन्च केलाय. सडपातळ, हलका, टचस्क्रीन आणि कन्व्हर्टेबल असा हा मल्टिपर्पज लॅपटॉप आहे. 

या लॅपटॉपचा ट्रेडमार्क 'योगा' डबल हिंट देतो... कारण, लॅपटॉपची स्क्रीन 360 अंशात तुम्ही फिरवू शकता... शिवाय हा लॅपटॉप अगदी सडपातळही आहे. 

लॅपटॉपच्या पृष्ठभागावर मॅट फिनिश डिझाईन आहे. लॅपटॉपला फूल साईज किबोर्ड देण्यात आलाय. घरी, ऑफिसमध्ये आणि हलके मल्टिमीडिया टास्क यावर आरामात केल्या जाऊ शकतात. 

डाव्या बाजुला केनिंग्सटन लॉक स्लॉट, प्रॉपरायटरी पॉवर कनेक्टर, यूएसबी 2.0 पोर्ट, एसडी कार्ड रिडर, रोटेशन लॉक बटन, वॉल्यूम रॉकर आहे. तर लॅपटॉपच्या उजव्या बाजुला इथरनेट पोर्ट, फूल साईज HMDI पोर्ट, यूएसबी 3.0 पोर्ट, एक यूएसबी 2.0 पोर्ट, पॉवर बटन आणि काही एलईडी नोटिफिकेशन लाईटस देण्यात आलेत. 

2.16 गिगाहर्टझ पेंटियम क्वॉड कोर प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 500 जीबी हार्ड ड्राईव्ह यामध्ये मिळतात. दोन सेलची इंटरनल बॅटरी जवळपास 4-5 तास आरामात चालतात.

हा लॅपटॉप 28,790 रुपयांत उपलब्ध आहे. तुम्ही जर लॅपटॉप खरेदीचा विचार करत असाल स्वस्तात मस्त असा हा ऑप्शन ठरू शकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.