नवी दिल्ली : खोटा रिव्ह्यू देणाऱ्या एक हजारांहून जास्त लोकांविरुद्ध 'अमेझॉन' या ऑनलाईन शॉपिंग कंपनीनं तक्रार दाखल केलीय.
या सर्वांनी आपल्या वेबसाईटबद्दल खोटे रिव्ह्यू दिल्याची तक्रार जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन रिटेलर असलेल्या 'अमेझॉन'नं दिलीय. या खोट्या रिव्ह्यूंमुळे कंपनीच्या प्रतिमेला धक्का लागल्याचंही अमेझॉननं म्हटलंय.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, कथितरुपात 1,114 लोकांनी जाणून-बुजून खोटे इंटरनेटवर रिव्ह्यू लिहून ग्राहकांच्या मनात असलेली कंपनीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केलाय. या रिव्ह्यूंमधून ग्राहकांना ते खोटी आणि चुकीची माहिती देत असल्याचं अमेझॉनचं म्हणणं आहे.
Fiverr.com वेबसाईटची ही खेळी असून असे रिव्ह्यू लिहिणाऱ्यांना या वेबसाईटकडून पाच डॉलर (जवळपास 325) रुपये मिळत असल्याचं अमेझॉननं म्हटलंय. आपल्याकडे या Fiverr.com च्या लोकांच्या नावांची यादीही आहे, ज्यांनी हे खोटे रिव्ह्यू लिहिलेत.
आता या लोकांची खरी ओळख पटावी यासाठी कायदेशीर मार्गानं जात अमेझॉननं न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.