भारतीय बाजारात लेनोव्हो दुसऱ्या स्थानी

चीनची स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेनोव्होने अॅपल, मायक्रोमॅक्स आणि ओप्पो या सर्व कंपन्यांना मागे टाकत भारतीय बाजारपेठेत दुसरे स्थान काबीज केलेय. 

Updated: Sep 5, 2016, 10:20 AM IST
भारतीय बाजारात लेनोव्हो दुसऱ्या स्थानी  title=

नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेनोव्होने अॅपल, मायक्रोमॅक्स आणि ओप्पो या सर्व कंपन्यांना मागे टाकत भारतीय बाजारपेठेत दुसरे स्थान काबीज केलेय. 

दुसऱ्या तिमाहीत विकल्या गेलेल्या स्मार्टफोनची संख्या पाहता लेनोव्हो हा भारतातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड ठरलाय. 

परवडणाऱ्या किंमती आणि अत्याधुनिक फीचर्स यामुळे इतर ब्रँडपेक्षा लेनोव्होला यूझर्सची पसंती अधिक मिळत आहे. 

आमच्यासाठी हे मोठे यश आहे. या यशामुळे आम्हाला अधिकच प्रेरणा मिळेल, असे लेनोव्हो इंडियाचे डायरेक्टर सुधीन माथूर यांनी सांगितले.