मुंबई : लावा इंटरनॅशनलने फ्यूल सिरीज अंतर्गत आपला दुसरा स्मार्टफोन आयरिस फ्यूल ६० बाजारात आणला आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ४००० एमएएच शक्तीची बॅटरी आहे. जी तब्बल ३२ तासांचा टॉक टाइम देते.
5 इंचाचा स्क्रीनवाला हा फोन एंड्रॉइड आधारित आहे आणि 1.3 जीएचजेड क्वॉड कोर प्रोसेसर आहे. याचा रिअर कॅमरा 10 एमपीचा ऑटो फोकस आहे. हा डुअल सीम फोन आहे आणि 3जी सपोर्ट करतो. हा 25 डिसेंबर पासून बाजारात उपलब्ध होणार आहे.
आइरिस फ्यूल ६० ची वैशिष्ट्ये
* स्क्रीन- 5 इंच हाय डेफिनेशन
* प्रोसेसर- 1.3 जीएचजेड क्वॉड कोर प्रोसेसर
* ओएस- एंड्रॉइड किटकॅट
* कॅमरा- 10 एमपी ऑटो फोकस रिअर, एलईडी फ्लॅश
* फ्रंट कॅमरा- 2एमपी
* रॅम- 1जीबी, 8 जीबी इंटरनल स्टोरेज, मायक्रो एसडी
* ऑडियो- 3.5 मिमी ऑडियो जॅक, एफएम रेडियो
* अन्य फीचर- 3जी, वाय-फाय 802.11, ब्लूटूथ 4.0, जीपीएस
* रंग- काळा आणि पांढरा
* बॅटरी- 4,000 एमएएच
* किंमत- 8,888 रुपये
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.