NTPCमध्ये नोकरीची संधी : ३४००० रुपये सॅलरी, सरकारी जॉबसाठी करा अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात तुम्हा आहात. तर तुमच्यासाठी ही खूशखबर. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड उत्तर क्षेत्रम मुख्यालयात इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, सिव्हील, सीएंडआय ट्रेडसाठी भरती करण्यात येणार आहे. तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता.

Updated: Dec 18, 2015, 11:22 AM IST
NTPCमध्ये नोकरीची संधी : ३४००० रुपये सॅलरी, सरकारी जॉबसाठी करा अर्ज title=

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात तुम्हा आहात. तर तुमच्यासाठी ही खूशखबर. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड उत्तर क्षेत्रम मुख्यालयात इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, सिव्हील, सीएंडआय ट्रेडसाठी भरती करण्यात येणार आहे. तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता.

पात्र उमेदवारांना पहिल्या वर्षी १५,५०० रुपये देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १५,५००-३ ट्क्के  ते ३४,५०० रुपये महिना दिले जाणार आहेत. यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा २५ वर्षे आहे. उमेदावाराचे वय २३ डिसेंबर २०१५ पर्यंत धरण्यात येईल. आरक्षण वर्गासाठी नियमानुसार सुट मिळेल.

शैक्षणिक पात्रता वर दिलेल्या ट्रेडनुसार आहे. तसेच उमेदवाराला ७० टक्के गुण आवश्यक असून डिप्लोमाधारक असावा. अर्ज भरण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. उमेदवारांसाठी ३०० रुपये शुल्क असणार आहे. तर मागासवर्गीय उमेवारांसाठी सूट आहे. अर्ज ऑनलाईन करायचा असून भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.

नोकरीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ डिसेंबर २०१५ आहे. ऑनलाईन अर्ज ३ डिसेंबरपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. लेखी परीक्षा १३ मार्च २०१६ ला होणार आहे. अधिक माहितीसाठी www.ntpccareers.net वर लॉगऑन करा.