नवी दिल्ली : जेएनयूमध्ये असिस्टंट, असोसिएटड आणि प्रोफेसरसाठीही नोकरीची संधी आहे. जवाहरलाल युनिव्हर्सिटीनं प्रोफेसरच्या १० जागा, असोसिएट प्रोफेसरच्या ५ जागा आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी ५ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्ही २९ सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करू शकता.
अधिक वाचा : नोकरीची संधी : राष्ट्रपती भवनात सेक्रेटेरियटमध्ये भरती
पद : प्रोफेसर
७ जागा
पगार ३७४०० ते ६७०००, ग्रेड पे १०,००० रुपये
पद : असोसिएट प्रोफेसर
५ जागा
पगार ३७४०० ते ६७०००, ग्रेड पे ९००० रुपये
पद : असिस्टंट प्रोफेसर
५ जागा
पगार १५६०० ते ३९१००, ग्रेड पे ६००० रुपये
याशिवाय, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं एअर ट्राफिक कंट्रोलसाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या ४०० पोस्टसाठी अर्ज मागवण्यात आलेत. या पदांमध्ये २०२ सामान्य जागा, १०८ - ओबीसी, ६० - एससी आणि ३० - एसटी वर्गासाठी रिझर्व्ह आहेत. शिवाय, एचएमटीमध्येही २१ पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.