'जिओ'ला धूळ चारण्यासाठी 'एअरटेल'ची फ्री डाटा-कॉल ऑफर

 देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून एअरटेलचा भारतभर बोलबाला आहे... 

Updated: Jan 21, 2017, 11:44 PM IST
'जिओ'ला धूळ चारण्यासाठी 'एअरटेल'ची फ्री डाटा-कॉल ऑफर title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून एअरटेलचा भारतभर बोलबाला आहे... परंतु, 'रिलायन्स जिओ'च्या फ्री डाटा आणि फ्री कॉल ऑफरनंतर या कंपनीलाही फटका बसला... त्यामुळेच जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी आता 'एअरटेल'नं फ्री डाटा आणि फ्री कॉलची ऑफर जाहीर केलीय.

एका वर्षासाठी ऑफर...

एअरटेलनं प्रीपेड आणि पोस्टपेड यूजर्ससाठी एका वर्षापर्यंत म्हणजेच डिसेंबर 2017 पर्यंत फोर जी इंटरनेट डाटा आणि कॉल्सची ऑफर दिलीय. आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी यामुळे एअरटेलला चांगलीच मदत होणार आहे.

काय करावं लागेल...

ही ऑफर मिळवण्यासाठी ग्राहकांना 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत नवं सिमकार्ड खरेदी करावं लागेल. सध्या टू जी आणि थ्री जी एअरटेल ग्राहकही आपलं सिमकार्ड फोर जी मध्ये अपग्रेड करून या ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

फ्री कॉल्स मिळवण्यासाठी...

फोर जी सिम यूजर्सना या ऑफरद्वारे प्रत्येक महिन्याला 3 जीबी फोर जी डाटासहीत एसटीडी आणि लोकल कॉल्सदेखील मोफत मिळणार आहेत. हा प्लान प्रीपेड यूजर्ससाठी आहे. महत्त्वाचं म्हणजे, या ऑफरचा फायदा मिळवण्यासाठी यूजर्सना एकदा आपलं सिमकार्ड 345 रुपयांनी रिचार्ज करावं लागेल...

पोस्टपेड यूजर्ससाठी...

पोस्टपेज यूजर्ससाठीही एअरटेलनं 'माय प्लान इन्फिनिटी' जाहीर केलाय. या प्लानमध्ये यूजर्सना 549 रुपये भरावे लागतील त्यानंतर संपूर्ण वर्षभर 6 जीबी फोर जी इंटरनेटसहीत फ्री कॉल्स ग्राहकांना मिळतील. यासाठी पोस्टपेड यूजर्सना माय एअरटेल अॅप डाऊनलोड करावं लागेल.