मुंबई : गुगल प्ले स्टोअरवर किंवा अॅपलच्या अॅप स्टोअरवरून विकत घेतलेल्या अप्लिकेशन्सवर कर लावण्याचा सरकार विचार करतंय.
प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअर्सवरून अनेक अॅप्लिकेशन्स विकत घेताना ग्राहकाला किंमत मोजावी लागते. त्यावर गुगल आणि अॅपल या दोन्ही कंपन्या उत्पन्न कमावतात. त्यामुळे सेवेची विक्री होत असल्यानं त्यावर कर लावण्याची तयारी सुरू करण्यात आलीय.
डिसेंबरच्या अखेरीस समायोजन कराच्या नावाखाली सहा ते सात टक्के कर लावण्यात येईल असं सूत्रांचं म्हणणं आहे.