मुंबई : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांची किंमत ओळखली आहे, किंबहूना इन्फोसिसला त्यांचं काम लाख मोलाचं वाटत असावं. कारण कर्मचाऱ्यांनी कंपनीला सोडून जाऊन नये यासाठी कंपन्या नवनवीन क्लुप्त्या लढवतात.
इन्फोसिसने अशा कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के बोनस देण्याचा विचार सुरू केला आहे. हा बोनस चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर महिन्यात संपलेल्या तिसऱ्या तिमाहीसाठी देण्यात येणार आहे.
यापूर्वीही इन्फोसिसने बोनस दिले होते, असं केल्याने कंपनी सोडून जाणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालंय. इन्फोसिसचे मुख्य कामकाज अधिकारी यू बी प्रवीण राव यांनी ही माहिती दिली आहे.
इन्फोसिसमधून वरिष्ठ पातळीवरील अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणावर सोडून गेला आहे. गेल्या काही वर्षांत इन्फोसिसमधून वरिष्ठ पातळीवरील अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणावर सोडून गेला, त्यामुळे कर्मचारी टिकून राहावेत यासाठी गंभीरपणे उपाययोजना करण्याची निकड निर्माण झाली.
त्याचवेळी कंपनीने डिसेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत १३ हजार १५४ नवे कर्मचारी घेतले, त्यामुळे ३१ डिसेंबर २०१४ रोजी इन्फोसिसची एकूण कर्मचारी संख्या १ लाख ६९ हजार ६३८ इतकी झाली. या सर्व प्रयत्नांमुळे मागील १२ महिन्यांच्या तुलनेत डिसेंबर २०१४ मध्ये कंपनी सोडून जाण्याचे प्रमाण २०.४ टक्के दिसून आले, त्यामुळे कंपनीने यावर गांभीर्याने विचार करून बोनसचा फंडा पुढे केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.