भारतीय वंशाची अनुष्का आयक्यू टेस्टमध्ये अव्वल

भारतीय वंशाची अनुष्का बियॉन ही मुलगी महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन आणि हॉकिंगपेक्षाही हुशार आहे. लंडनची रहिवासी अनुष्काने नुकत्याच झालेल्या मेनसा आयक्यू टेस्टमध्ये १६२ गुण मिळवले. यासह ती सर्वात बुद्धिमान लोकांच्या यादीत सामील झालीय. 

Updated: Dec 7, 2015, 10:07 AM IST
भारतीय वंशाची अनुष्का आयक्यू टेस्टमध्ये अव्वल title=

लंडन : भारतीय वंशाची अनुष्का बियॉन ही मुलगी महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन आणि हॉकिंगपेक्षाही हुशार आहे. लंडनची रहिवासी अनुष्काने नुकत्याच झालेल्या मेनसा आयक्यू टेस्टमध्ये १६२ गुण मिळवले. यासह ती सर्वात बुद्धिमान लोकांच्या यादीत सामील झालीय. 

अनुष्काचे वडील विनय जोसेफ हे आयटी कन्सल्टंट असून ते केरळचे राहणारे होते. मुलीच्या या अद्भुत यशाबाबत आनंद व्यक्त करताना जोसेफ म्हणाले, माझी मुलगी हुशार आहे याची कल्पना होतीच मात्र इतकी जास्त हुशार असेल याचा अंदाज नव्हता. 

११ वर्षाच्या अनुष्काला पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड आहे. तसेच तिची स्मरणशक्तीही चांगली असल्याचे जोसेफ यांनी यावेळी सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.