बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्कस मिळवण्याची युक्ती

 सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन मार्च आणि एप्रिल महिन्यात केलं जाणार आहे, बोर्ड परिक्षांवरून विद्यार्थ्यांमध्ये थोडंस भीतीदायक वातावरण असतं, यासाठी याची पहिल्यापासून तयारी होणे आवश्यक असते, खाली अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थांना चांगले मार्कस मिळू शकतात.

Updated: Jan 18, 2016, 05:23 PM IST
बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्कस मिळवण्याची युक्ती title=

नवी दिल्ली :  सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन मार्च आणि एप्रिल महिन्यात केलं जाणार आहे, बोर्ड परिक्षांवरून विद्यार्थ्यांमध्ये थोडंस भीतीदायक वातावरण असतं, यासाठी याची पहिल्यापासून तयारी होणे आवश्यक असते, खाली अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थांना चांगले मार्कस मिळू शकतात.

  • सर्वात आधी सुरूवातीपासून नियमित अभ्यास करा, शेवटच्या तयारी केली तर फायदा नाही.
  • नमुना पाहून येत असलेल्या अडचणी सोडवा, चाचणी पेपर तयार करून परीक्षेसारखी तयारी करा.
  • एनसीईआरटी टेस्ट बुकच्या प्रत्येक शब्दाचा अभ्यास करा, परीक्षेमधील जास्तीत जास्त प्रश्न या पुस्तकांमधून येतात.
  • अभ्यासासाठी वेळेचं नियोजन करा, वेळेनुसार अभ्यास करा.
  • परीक्षेत स्पष्ट आणि चांगल्या अक्षरात लिहण्याचा प्रयत्न करा, या सारावामुळे परीक्षेत वेळेत पेपर लिहिण्यास मदत होते.
  • नेहमी रिलॅक्स रहा, रिलॅक्स राहण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत, कुणी झोपतं, कुणी खेळतं, कुणी टीव्ही अथवा सिनेमा पाहणं पसंत करतं, तुम्ही रिलॅक्स राहण्यासाठी, जे आवडतं ते करा.