सोनं नकली निघालं, तर ऑनलाईन तक्रार करा

नकली सोनं आणि शुद्धता आणि विक्रीतील गडबड याची तक्रार करण्यासाठी आता भारतीय मानक ब्युरोने ऑनलाईन व्यवस्था केली आहे. आता सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित कोणतीही तक्रार असेल, तर ग्राहकांना आता भारतीय मानक ब्युरोच्या कार्यालयाच्या खेटा मारायची गरज नाही.

Updated: Jan 18, 2016, 02:23 PM IST
सोनं नकली निघालं, तर ऑनलाईन तक्रार करा title=

मुंबई : नकली सोनं आणि शुद्धता आणि विक्रीतील गडबड याची तक्रार करण्यासाठी आता भारतीय मानक ब्युरोने ऑनलाईन व्यवस्था केली आहे. आता सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित कोणतीही तक्रार असेल, तर ग्राहकांना आता भारतीय मानक ब्युरोच्या कार्यालयाच्या खेटा मारायची गरज नाही.

कारण आता ग्राहक घरबसल्या तक्रार करू शकतात. तक्रार केल्यानंतर भारतीय मानक ब्युरो ती तक्रार तात्काळ संबंधित कार्यालयाला पाठवतात, आणि कारवाई सुरू होते. भारतीय मानक ब्युरोच्या नियमानुसार, सोन्याची शुद्धता ही शंभर टक्के सोनं गाळून पाहून केल्यानंतरच होते. ते दुकानातील मशीनवर होऊ शकत नाही. अनेक राज्यांमध्ये मानक ब्युरोचं एकमेव कार्यालय आहे. अशा ठिकाणी ग्राहकांना तक्रार करण्यास अडचणी येतात.

दुकानदार सोन्याची शुद्धता तसेच बिल देतांनाही घोळ करतात. मेकिंग चार्ज, हॉलमार्क चार्ज, कॅश मेमोत सोन्याविषयी पूर्ण माहिती न लिहिणे. कॅश मेमोत सोन्याची शु्दधता लिहिणं गरजेचं आहे. काही दुकानदार हॉलमार्कचा चार्ज २५ रूपयाच्या जागी, १०० रूपये प्रति ग्रॅम लावतात.

यात तुम्हाला तफावत दिसत असेल तर, भारतीय मानक ब्युरोची साईट www.BIS.ORG.IN लॉग इन करा. तुमची तक्रार रजिस्टर करा. तुमचा युझर आयडी पासवर्ड टाका, यानंतर एक पेज उघडेल, तिथे तुमची तक्रार लिहा.