तुमच्या मोबाईलवर 'नको असलेले मार्केटिंग कॉल' असे बंद करा

तुम्ही अनेक वेळा कामात असतात, आणि तुम्हाला मोबाईलवर मार्केटिंगचे कॉल हैराण करतात. "मै इस-इस कंपनी सें बात कर रहा हूँ", सारखे हे कॉल असतात, आपल्याला नाही म्हणायलाही वेळ नसतो.

Updated: Sep 30, 2015, 06:46 PM IST
तुमच्या मोबाईलवर 'नको असलेले मार्केटिंग कॉल' असे बंद करा title=

मुंबई : तुम्ही अनेक वेळा कामात असतात, आणि तुम्हाला मोबाईलवर मार्केटिंगचे कॉल हैराण करतात. "मै इस-इस कंपनी सें बात कर रहा हूँ", सारखे हे कॉल असतात, आपल्याला नाही म्हणायलाही वेळ नसतो.

हे कॉल ऐकतांना आपला वेळ वाया जात असतो, अनेक महत्वाची कामं या गडबडीत राहून जातात यासाठी ट्रायने मागील अनेक वर्षापासून डू नॉट डिर्स्टब अर्थात डीएनडीचा पर्याय दिला आहे.

तुम्हालाही असे नको असलेले मार्केटिंगचे कॉल बंद करायचे असतील, तर तुमच्या मोबाईलवरून मेसेज करा, Start 0 लिहून 1909 ला पाठवा

जर तुम्हाला टाईप करून मेसेज पाठवायचा नसेल, तर तुम्ही 1909 या नंबरवर फोन करूनही मार्केटिंग कॉल बंद करू शकता.

1 बँकिंग/इन्शुरन्स/आर्थिकबाबीशी संबंधित/क्रेडीट कार्डस
2 रियल इस्टेट
3 शिक्षण
4 आरोग्य
5 ऑटोमोबाईल्स
6 संवाद/ब्रॉडकास्टिंग/मनोरंजन/आयटी
7 पर्यटन

www.24taas.com

आता यापैकी तुम्हाला बँकिंगशी संबंधित मार्केटिंग कॉल हवे असतील तर 1909 नंबरवर  Start 1 मेसेज पाठवा, समजा जर तुम्हाला शिक्षण आणि ऑटोमोबाईल्सचे मार्केटिंग कॉल हवे असतील तर 1909 ला Start 3,5 मेसेज पाठवा.

तुम्ही सर्व कॉल्स प्रकारचे कॉल मेसेजेस बंद केले, तरी तुम्हाला तुमचा पगार जमा झाल्याचे अथवा, एटीएमचे व्यवहाराचे मेसेजे येत राहतात, त्यामुळे तुम्हाला कोणतेही सतावणारे कॉल नको असतील तर, 1909 नंबरवर  Start 0 मेसेज लिहून पाठवा.

पुढच्या स्टोरीत आपण वाचा, जर मेसेज करूनही तुम्हाला कॉल येत असतील तर ट्रायकडे ऑनलाईन किंवा मेसेजने तक्रार कशी करायची.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.