कशा तयार होतात नोटा?

हल्लीच्या जमान्यात पैशाला खूप महत्त्व दिले जाते. पैशाचे जीवनात मोठे स्थान आहे. पैसा पैसा सगळेच करतात मात्र हे पैसे कसे तयार होतात तुम्हाला माहीत आहे का? नोटा कशा तयार होतात घ्या जाणून

Updated: Aug 24, 2016, 07:43 PM IST
कशा तयार होतात नोटा? title=

मुंबई : हल्लीच्या जमान्यात पैशाला खूप महत्त्व दिले जाते. पैशाचे जीवनात मोठे स्थान आहे. पैसा पैसा सगळेच करतात मात्र हे पैसे कसे तयार होतात तुम्हाला माहीत आहे का? नोटा कशा तयार होतात घ्या जाणून

नोटांचा कागद तयार करण्यासाठी जगात चार फर्म आहेत. बँक किती रुपयांच्या किती नोटा छापेल हे विकास दर, चलनवाढीचा दर, फाटलेल्या नोटांची संख्या आणि रिझर्व्ह स्टॉक यावर अवलंबून असते. 

आपल्या देशात चार बँक नोट प्रेस, चार टंकसाळ आणि एक पेपर मिल आहे. नोट प्रेस मध्य प्रदेशच्या देवास, नाशिक, सालबोनी आणि मैसूरमध्ये आहे. १००० रुपयांच्या नोटा मैसूरमध्ये छापल्या जातात. देवास येथील प्रेसनोटमध्ये एका वर्षात २६ कोटी नोटा छापल्या जातात. यात २०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या नोटाचा समावेश आहे. 

मध्य प्रदेशच्या होशंगाबादमध्ये सिक्युरिटी पेपर मिल आहे. नोटांसाठी छपाई पेपर होशंगाबाद आणि परदेशातून येतो. तर टंकसाळ मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडामध्ये आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा नोट तयार करण्यासाठी कापूसपासून बनलेला कागद आणि विशेष शाईचा वापर केला जातो. नोटांसाठी वापरली जाणारी शाईची निर्मिती सिक्कमस्थित स्वीस फर्मच्या युनिट सिक्पामध्ये बनवली जाते. 

ऱिझर्व्ह बँकेची देशभरात १८ इश्यू ऑफिसेस आहेत. प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यात आलेल्या नोटा सर्वप्रथम या ऑफिसेसमध्ये पाठवल्या जातात. त्यानंतर कर्मशियल बँकेच्या शाखांमध्ये पाठवल्य़ा जातात.