मुंबई : भारतातील बाईक उत्पादन कंपनी हिरोने i3s टेकनिकची एचएफ डिलक्स बाईक लॉन्च केली आहे. हिरोची ही बाईक 'आयडल स्टार्ट स्टॉप सिस्टमवर चालते. आधी कंपनीने स्पलेंडर बाईकमध्ये ही टेकनिक दिली होती. दिल्लीमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत 46,630 रुपये आहे.
हिरोने विकसित i3s च्या टेकनिकचा फायदा शहरातील ट्रॅफिकच्या वेळेस अधिक होणार आहे. या सिस्टममुळे बाईक थोडा वेळ उभी राहिली की ऑटोमॅटिक स्टॉप आणि पुन्हा स्टार्ट होते. जेव्हा बाईक न्यूट्रल गेअरमध्ये असते तेव्हा बाईक स्वत:च बंद होते. जेव्हा बाईक चालक क्लच दाबतो तेव्हा इंजिन पुन्हा ऑटोमॅटिक स्टार्ट होतं आणि रायडर त्यानंतर कोणत्याही गेअरमध्ये गाडी चालवू शकतो.
इंजनबाबत म्हटलं तर जुन्या HF Deluxe मध्ये कोणताही बदल नाही करण्यात आला आहे. या नव्या बाईकला BS-IV एमिशन नॉर्म्सच्या हिशोबाने तयार करण्यात आलं आहे. हिरो HF Deluxe i3s मध्ये 97.2cc चं सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन आहे. या इंजिनला 4 स्पीड गेअरबॉक्स आहेत. इंजिन 8,000 आरपीएमवर 8.25 BHP ची ताकद जनरेट करतो. तर 5,000 आरपीएमवर 8.05 Nm टॉर्क जनरेट करतो.