मुंबई : व्हॉट्सअॅपने सगळ्या अँड्राईड यूजर्ससाठी नवा पिन टू टॉप फीचर लॉन्च केला आहे. मागील महिन्यात याचा बीटा व्हर्जन याला होता. या फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप यूजर्सला आपले आवडते चॅट्स वर ठेवता येणार आहेत. यामध्ये युजर कोणतेही ३ चॅट वर ठेऊ शकतो.
व्हॉट्सअॅपने त्यांच्या एका वक्तव्यात म्हटलं होतं की, 'पिन चॅट्ससोबत युजरला त्यांचे मित्र, नातेवाईक यांच्याशी बोसण्यासाठी आता पुन्हा पुन्हा स्क्रोल नाही करावा लागणार. युजर आता कोणतेही ३ चॅटस सर्वात वर ठेवू शकतात. त्यासाठी कॉनटॅक्टला लाँग होल्ड करुन ठेवावं लागेल. त्यांनतर वर दिलेल्या पिनवर क्लिक करावं लागेल.
युजर फक्त ३ चॅट पिन टू टॉप करु शकतात. जर यूजर ३ पेक्षा अधिक चॅट्स वर ठेवतो तर 'You can only pin up to 3 chats असा मॅसेज तुम्हाला दिसेल. जो चॅट कॉन्टॅक्ट तुम्ही वर पिन करुन ठेवला तो कॉन्टॅक्ट इतर कोणाचाही नवा मॅसेज आला तरी खाली नाही जाणार. कॉन्टॅक्ट होल्ड क्लिक करुन ठेवल्यानंतर डिलीट, म्यूट आणि आर्काइव आयकॉन देखील दिसतील.
काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने व्हिडियो कॉल आणि अटॅचमेंट आयकॉनला रिप्लेस केलं होतं. व्हिडिओ कॉलिंगसाठी नवा आयकॉन आला होता. आधी कॉलिंगसाठी दोन आयकॉन दिसायचे पण आता व्हिडिओ कॉल आणि वॉईस कॉलचे आयकॉन वेगळे झाले आहेत. सोबतच अटॅचमेंट आयकॉनच्या जागा देखील बदलली आहे. याला चॅट बॉक्समध्ये दिला गेला आहे.