www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चला मित्रांनो सरकारी नोकरीची संधी आहे... तुमचं शिक्षण कमी झालंय म्हणून घाबरून जावू नका... केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच नॉन टेक्निकल भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पे-बॅण्ड-१ मध्ये (रू.५२००-२०२००) अधिक ग्रेड पे (रू.१८००) इतक्या वेतनमानची ही नोकरी असेल. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ही त्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठीची परीक्षा फी रू.१००/- (महिला, एस.सी./एस.टी आणि अपंग उमेदवारांना फी माफ आहे)
वयोमर्यादा - १८ ते २५ वर्षे (१ जानेवारी २०१४ रोजी), अनुसूचित जाती/जमातीसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्षे शिथिलक्षम आहे. तर इतर मागासवर्गायांसाठी कमाल वयोमर्यादा ३ वर्षे शिथिलक्षम आहे.
या परिक्षेसाठी अर्ज भरण्याची शैक्षणिक पात्रता आहे केवळ दहावी पास. तर ही लेखी परीक्षा १६ आणि २३ फेब्रुवारी २०१४ रोजी घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी दोन प्रश्नपत्रिका असतील.
पहिला पेपर
पहिला पेपर हा ऑबजेक्टिव्ह असेल. १५० मार्कांचा हा पेपर यासाठी २ तासांचा वेळ दिला जाईल. प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी भाषेत असेल. कमिशनला तांत्रिकदृष्टया शक्य झाल्यास प्रश्नपत्रिका प्रादेशिक भाषेत (उदा. मराठी) देखील काढली जाईल. या पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कमी केले जातील.
जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग (२५ गुण), न्यूमरिकल अॅप्टिटयूड (२५ गुण), जनरल इंग्रजी (५० गुण), जनरल अवेअरनेस (५० गुण) अशी एकूण १५० गुणांची प्रश्नपत्रिका असेल.
दुसरा पेपर
दुसरा पेपर हा डिस्क्रिप्टीव्ह म्हणजेच वर्णनात्मक असेल. ५० मार्कांच्या या पेपरसाठी १ तासाचा अवधी मिळेल. यात इंग्रजी आणि कोणत्याही भारतीय भाषेमध्ये छोटा निबंध आणि पत्र लेखन आदींचा समावेश असेल. यात उमेदवारांची प्राथमिक स्तरावरील भाषिक कौशल्यं तपासली जातात. पेपर -२ मध्ये कमीतकमी पासिंग मार्क्स मिळवणं आवश्यक आहे.
निवडप्रक्रिया - यशस्वी उमेदवारांची निवड पेपर -१ मधील गुणांनुसारच केली जाईल. मुलाखत घेतली जाणार नाही.
प्रवेश अर्ज १३ डिसेंबर २०१३पर्यंत कमिशनकडे पोहचले पाहिजेत. प्रवेश अर्ज ऑनलाईन किंवा पोस्टानं भरता येतील.
जाहिरातीसाठी आणि प्रवेश अर्जासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाईट पहावी. (http://ssc.nic.in)
विशेष नोट: वेबसाईट पहाण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राऊझरचा वापर करावा.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.