गुगल नेक्सस ५एक्स तब्बल सात हजारांनी स्वस्त

महिन्याभरापूर्वीच लाँच करण्यात आलेला गुगलचा 'नेक्सस ५एक्स' हा स्मार्टफोन किंमत तब्बल सात हजार रुपयांनी स्वस्त झालाय. ऑनलाईन साईटवर हा स्मार्टफोन मूळ किंमतीपेक्षा सात हजारांनी स्वस्त आहे. अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत २४,९०० तर फ्लिपकार्टवर याची किंमत २५, २४९ इतकी आहे. 

Updated: Nov 27, 2015, 01:38 PM IST
गुगल नेक्सस ५एक्स तब्बल सात हजारांनी स्वस्त  title=

नवी दिल्ली : महिन्याभरापूर्वीच लाँच करण्यात आलेला गुगलचा 'नेक्सस ५एक्स' हा स्मार्टफोन किंमत तब्बल सात हजार रुपयांनी स्वस्त झालाय. ऑनलाईन साईटवर हा स्मार्टफोन मूळ किंमतीपेक्षा सात हजारांनी स्वस्त आहे. अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत २४,९०० तर फ्लिपकार्टवर याची किंमत २५, २४९ इतकी आहे. 

गेल्या महिन्यात लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनची किंमत १६ आणि ३२ जीबीसाठी अनुक्रमे ३१,९०० आणि ३५,९०० इतकी ठेवण्यात आली होती. मात्र स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ होण्यासाठी १६ जीबीच्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने कमी केलीय. 

या स्मार्टफोनमध्ये १.८२ गिगाहर्टझ हेक्सा कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असून दोन जीबी रॅम आहे. यात १२.३ मेगापिक्सेल रेयर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. तसेच फोरजी कनेक्टीव्हीटीला हा स्मार्टफोन सपोर्ट करतो. यासह फिंगरप्रिंट स्कॅनर हे या स्मार्टफोनचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.