अवघ्या १९ पैसे/ मिनिटाने करा एसटीडी, लोकल कॉल

वाढत्या कॉल दरामुळे हल्ली व्हॉईल कॉलिंगपेक्षा मेसेज करण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र जर तुम्हाला एसटीडी आणि लोकल असे दोन्ही कॉल १९ पैसे प्रति मिनिट दराने मिळाले तर? मात्र हे शक्य आहे. यासाठी तुम्हाला विशेष असे काही करावे लागणार नाही. केवळ एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. ज्याच्या मदतीने तुम्ही १९ पैसे प्रति मिनिट दराने व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. 

Updated: Nov 27, 2015, 10:07 AM IST
अवघ्या १९ पैसे/ मिनिटाने करा एसटीडी, लोकल कॉल title=

नवी दिल्ली : वाढत्या कॉल दरामुळे हल्ली व्हॉईल कॉलिंगपेक्षा मेसेज करण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र जर तुम्हाला एसटीडी आणि लोकल असे दोन्ही कॉल १९ पैसे प्रति मिनिट दराने मिळाले तर? मात्र हे शक्य आहे. यासाठी तुम्हाला विशेष असे काही करावे लागणार नाही. केवळ एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. ज्याच्या मदतीने तुम्ही १९ पैसे प्रति मिनिट दराने व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. 

फेमस व्हॉईस कॉलिंग अॅप रिंगोने गुरुवारपासून एसटीडी आणि लोकल कॉलसाठी १९ पैसे प्रति मिनिट दराची घोषणा केलीय. रिंगो अॅपवरुन कॉल केल्यास दर मिनिटाला तुमचे केवळ १९ पैसे खर्च होतील. याच वर्षी हे अॅप भारतात लाँच करण्यात आलंय.

याच्या तुलनेत इतर टेलिकॉम कंपन्यांचे एसटीडी दर प्रतिमिनट १.२० इतके आहेत. तर लोकल कॉल प्रति मिनिट ०.४० पैसे आहेत. त्या तुलनेत रिंगो अत्यंत कमी दरात ही सेवा देत आहे. या अॅपच्या मदतीने ग्राहकांचे फोन बिल ९० टक्क्यांपर्यंत कमी होईल असा दावा रिंगोने केलाय. 

कसं काम करतं हे अॅप
सर्वात आधी तुम्हाला हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. जेव्हा तुम्ही या अॅपच्या मदतीने कॉल कराल तेव्हा तो कॉल सरळ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या आधी रिंगोकडे जाईल त्यानंतर रिंगो हा कॉल व्यक्तीशी कनेक्ट करेल. समोरच्या व्यक्तीकडे रिंगो अॅप नसेल तरीही तुम्ही या अॅपद्वारे कॉल करु शकता. प्लेस्टोरवरुन तुम्ही हे अॅप मोफत डाऊनलोड करु शकता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.