मिस्ड कॉल द्या आणि मोबाईल रिचार्ज मिळवा

एचडीएफसी बँक आता पेटीएमला टक्कर देण्यासाठी रिचार्ज बिझनेसमध्ये उतरणार आहे. एचडीएफसी बँकेने मिस्ड कॉलवर ग्राहकांना मोबाईल रिचार्ज देण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Dec 5, 2015, 04:05 PM IST
मिस्ड कॉल द्या आणि मोबाईल रिचार्ज मिळवा title=

कोलकाता : एचडीएफसी बँक आता पेटीएमला टक्कर देण्यासाठी रिचार्ज बिझनेसमध्ये उतरणार आहे. एचडीएफसी बँकेने मिस्ड कॉलवर ग्राहकांना मोबाईल रिचार्ज देण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. 

यासाठी ग्राहकांना टेक्स मेसेज करुन ही सर्व्हिस अॅक्टिवेट करावी लागेल. त्यानंतर ग्राहकांना जितक्या किंमतीचे रिचार्ज करायचे आहे ती रक्कमही मेसेज करावी लागेल. यानंतर मिस्ड कॉल दिल्यास मोबाईलमध्ये रिचार्ज  पाठवले जाईल. 

ग्राहक एका मेसेजद्वारे ही सर्व्हिस अॅक्टिवेट करु शकतात. एचडीएफसी बँकेचे प्रमुख नितिन चुग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेचे जे ग्राहक एसएमएस बँकिग वापरतात ते सर्व एका मेसेजवर ही सर्व्हिस अॅक्टिवेट करु शकतात. ही सर्व्हिस ५० रुपयाच्या रिचार्जसाठी लागू होईल. जर ग्राहकांना दुसरी रक्कम ठेवायची असल्यास तेही शक्य आहे. 

दरम्यान, एचडीएफसीची ही सुविधा केवळ बँकेच्या ग्राहकांपर्यंत सिमित राहील. बँकेचे  डेबिटकार्डधारक २.४१ कोटी कस्टमर या सेवेचा फायदा घेऊ शकतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.