नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी जिओनी आता एक असा स्मार्टफोन घेऊन येतेय ज्यामध्ये १०० मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीनं या फोनला 'जिओनी एलाइफ ई-८' असं नाव दिलंय. ४१ मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या नोकियाच्या ल्युमिया १०२० स्मार्टफोनहून हा स्मार्टफोन दुप्पटीनं चांगला असेल, असा दावा केला जातोय.
'जिओनी एलाइफ ई-८'मध्ये कॅमेरा २३ मेगापिक्सलचा आहे. परंतु, यामध्ये लॉसलॅस ज्युम सेन्सर टेक्नॉलॉजी देण्यात आलीय. या टेक्नॉलॉजीमुळे १०० मेगापिक्सल क्वॉलिटीचा फोटो आणि ४-के क्वॉलिटीचा व्हिडिओ शूट करता येऊ शकेल. हा स्मार्टफोन लवकरच बाजारात उतरवण्यात येईल, असं समजतंय.
'जिओनी एलाइफ ई-८'चे फिचर्स...
४.६ इंचाची १४४० X २५६० पिक्सल स्क्रीन
२ गीगाहर्टझ ऑक्टाकोर प्रोसेसर
३ जीबी रॅम
३२ जीबी इंटरनल मेमरी
३२ मेगापिक्सल कॅमेरा
फिंगर प्रिंट सेन्सर
मेटल फ्रेम
३५२० मेगाहर्टझ बॅटरी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.