पुन्हा येतोय, 'फ्लिपकार्ट'चा 'बिग बिलियन डे'!

ऑनलाईन विक्रेता वेबसाईट 'फ्लिपकार्ट'चा बिग बिलियन सेल येत्या १३ ऑक्टोबरपासून सुरू होतोय. ऑनलाईन शॉपिंगच्या आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी ही नक्कीच पर्वणीच ठरेल. 

Updated: Sep 29, 2015, 10:32 AM IST
पुन्हा येतोय, 'फ्लिपकार्ट'चा 'बिग बिलियन डे'! title=

नवी दिल्ली : ऑनलाईन विक्रेता वेबसाईट 'फ्लिपकार्ट'चा बिग बिलियन सेल येत्या १३ ऑक्टोबरपासून सुरू होतोय. ऑनलाईन शॉपिंगच्या आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी ही नक्कीच पर्वणीच ठरेल. 

फ्लिपकार्ट आपल्या बिग बिलियन सेलच्या दुसऱ्या भागाचा शुभारंभ पुढच्या महिन्यात करणार असेल. हा सेल १३ ऑक्टोबरपासून ते १७ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. 

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, या सेलमध्ये खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल अॅप असणं आवश्यक आहे. कंपनीनं या दरम्यान ७०हून अधिक उत्पादन श्रेण्यांमच्या खास ऑफर्स आणि डिस्काऊंची घोषणा केलीय. 

या पाच दिवसीय आयोजनादरम्यान फ्लिपकार्ट आणि मिंत्रा 'बिग बिलियन डेज'
मध्ये भागीदारी करणार आहेत. 

उल्लेखनीय म्हणजे, गेल्यावर्षीही फ्लिपकार्टनं आपला 'बिग बिलियन डे' आयोजित केला होता. पण, तांत्रिक बिघाडांमुळे ग्राहकांच्या पदरी निराशाच पडली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.