व्हिडिओ : का होतात महिला हिंसाचाराचं टार्गेट, पाहा...

महिला अत्याचाराच्या अनेक घटना आपल्यासमोर दररोज वेगवेगळ्या माध्यमांतून येत असतात. पण, हळहळण्या पलिकडे आपण काय करू शकतो? असाही विचार अनेक जण करतात. मग आपण त्याविरुद्ध आवाज उठवतो का? असा प्रश्न आपण स्वत:लाच कधी विचारलाय का?

Updated: Nov 11, 2014, 08:37 AM IST
व्हिडिओ : का होतात महिला हिंसाचाराचं टार्गेट, पाहा... title=

मुंबई : महिला अत्याचाराच्या अनेक घटना आपल्यासमोर दररोज वेगवेगळ्या माध्यमांतून येत असतात. पण, हळहळण्या पलिकडे आपण काय करू शकतो? असाही विचार अनेक जण करतात. मग आपण त्याविरुद्ध आवाज उठवतो का? असा प्रश्न आपण स्वत:लाच कधी विचारलाय का?

२५ नोव्हेंबरला जगभरात महिला अत्याचाराविरुद्ध हिंसा निर्मूलन दिवस पाळला जाईल. पण, खरोखरच आपण महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसेबद्दल संवेदनशील झालो आहोत का? एक समाज म्हणून आपण महिलांना सुरक्षित वातावरण देऊ शकलोय का? असे अनेक प्रश्न आपण एकदा तरी विचारायलाच हवेत... स्वत:ला आणि समाजालाही..

एखाद्या सार्वजनिक ठिकाणी महिला अत्याचाराला किंवा हिंसेला सामोऱ्या जात असतील तर अशा वेळी आजुबाजुला उपस्थित असणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात... हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल... जरूर पाहा...  
व्हिडिओ पाहा :-
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.