मुंबई : वर्किंग वुमन अर्थात कामकाजी महिलांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जातोय.
एखादी स्त्री तिच्या करिअरमध्ये प्रगती करत असेल तर तिला अनेकदा अनेक गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. ती कर्तव्यदक्ष गृहिणी नसेल... ते बॉससोबतच्या सलगीमुळे तिला प्रमोशनमिळालं इथपर्यंत... किंवा त्यापेक्षाही जास्त... मग, यामध्ये बाहेरच्यांसोबतच कुटुंबियही मागे नसतात.
ही एका ज्वेलरी ब्रॅन्डची जाहिरात मात्र याच विचारसरणीवर परखडपणे प्रत्यूत्तर देताना दिसतेय.