सिंगल असणाऱ्यांसाठी खास फेंगशुई टिप्स

तुम्ही गुडलुकिंग आहात, चांगली नोकरी आहे मात्र त्यानंतरही तुम्ही अजून सिंगल आहात का? तर यामागे फेंगशुई समस्याही कारण असू शकते. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा सकारात्म वा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होत असतो. त्यामुळे खालील फेंगशुईचे उपाय केल्यास लवकरच तुम्हाला मिस्टर राईट अथवा मिस राईट मिळू शकते. 

Updated: Aug 24, 2016, 08:56 PM IST
सिंगल असणाऱ्यांसाठी खास फेंगशुई टिप्स title=

मुंबई : तुम्ही गुडलुकिंग आहात, चांगली नोकरी आहे मात्र त्यानंतरही तुम्ही अजून सिंगल आहात का? तर यामागे फेंगशुई समस्याही कारण असू शकते. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा सकारात्म वा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होत असतो. त्यामुळे खालील फेंगशुईचे उपाय केल्यास लवकरच तुम्हाला मिस्टर राईट अथवा मिस राईट मिळू शकते. 

१. आपल्या बेडरुममध्ये आर्ट वर्क, लँडस्केप, वॉलपेपर्स लावा. दक्षिणपश्चिम कोपऱ्यात क्रिस्टल ठेवा.

२. तुमच्या बेडरुममध्ये सिंगल खुर्ची असल्यास याचा अर्थ तुम्हाला एकटे राहायला आवडते. त्यामुळे बेडरुममध्ये सोफा अथवा अनेक खुर्च्या ठेवा. 

३. बेड आणि दरवाज्यात अंतर असावे. तसेच झोपताना पाय दरवाज्याकडे असणार नाहीत याकडे लक्ष द्या.

४. बेडरुममध्ये पिंक, रेडसारखे कलर वापरा.

५. चांगल्या रिलेशनशिपसाठी बेडरुममध्ये टीव्ही असणे चांगले मानले जात नाही.