नवी दिल्ली : फेसबुकवर टाकलेली आक्षेपार्ह विधानं हटविण्यासाठी किंवा लपवण्यासाठी किंवा कन्टेन्ट रेग्युलेट करण्यासाठी ज्या ज्या देशांतून फेसबुककडे विचारणा केली गेली... त्या ८३ देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे.
भारत सरकार यूझर्सच्या अकाऊंटमध्ये जाऊन अशी मागणी करण्यात जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा प्रकारच्या मागण्या ५९५८ वेळा भारत सरकारनं फेसबुककडे केल्यात. यामध्ये, अमेरिकेनं सगळ्यात पुढे म्हणजे २३,६६७६ वेळा अशा मागण्या करून पहिला क्रमांक मिळवलाय.
भारत सरकारनं २०१४ च्या सहा महिने अगोदर जवळपास पाच हजार पोस्ट हटवण्याची मागणी केली होती. फेसबुकनं हा ‘गव्हर्नमेंट रिक्वेस्ट रिपोर्ट’ जाहीर केलाय. यात जवळपास ८३ देशांची नावं आहेत.
‘भारतीय अधिकाऱ्यांकडून आणि इंडिया कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून धर्म किंवा राज्याबदद्ल आक्षेपार्ह विधानांवर बंदी घालण्यासाठी केलेल्या मागणीनुसार स्थानिक कायद्यानुसार आम्ही भारतीतील काही पोस्टवर आणि मजकुरांवर बंदी आणली’ असं या रिपोर्टच्या भारतासंबंधी दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं गेलंय.
दहा करोड युजर्ससहीत भारतात अमेरिकेनंतर सर्वात जास्त फेसबुक युझर्स आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.