www.24taas.com, उल्हासनगर
ठाणे जिल्ह्यातील एका विवाहितेला फेसबुकमुळे न्याय मिळाला आहे. याकामी तिला मदत झाली ती तिच्या मैत्रिणीची. सोशलनेटवर्किंग साईटमुळे तिच्या संसाराचा गाडा रूळावर येण्यास मदत झाली आहे. विवाह होऊनसुद्धा घरच्या मंडळींसमोर झुकून त्यांने पुन्हा विवाह केला आणि तिच्यावर अन्याय झाला.
पहिली पत्नी जिवंत असताना नवर्यांने दुसरा विवाह करून केलेल्या अन्यायाला फेसबुकवरून वाचा फोडण्यात आली आणि त्या पीडीत महिलेला न्याय मिळाला. उल्हासनगरातील विवाहितेच्या बाबतीतील ही घटना आहे.
कॅम्प नं-४ संभाजी चौक परिसरात राहणार्या डिंपल हिचे उत्तरप्रदेशातील राहणार्यां विपीन मिश्रा याच्यासोबत ३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. संसार सुरू असताना त्यांना कन्या रत्नप्राप्त झाले. मात्र, असे असताना विपीनने आई-वडिलाच्या सांगण्यानुसार दुसरे लग्न केले. याचा धक्का डिंपलला बसला होता. डिंपलच्या मैत्रिणींनी झालेल्या अन्यायाची वाचा फेसबुकच्या माध्यमातून जगासमोर आणली. या अन्यायाला देशभरातून प्रतिसाद मिळत असतांना, ही अन्यायाची कथा डिंपल हिच्या नवर्यारच्या भदोही गावचा नागरिकांनीही वाचली.
अन्याय झालेल्या डिंपलच्या बाजूने विपीनच्या गावातील नागरिक पुढे आले. तिला न्याय देण्यासाठी पुढे पाऊल टाकले. अखेर तिला न्याय मिळाला आहे. डिंपल ३0 नोंव्हेबरला उत्तरप्रदेशातील भदोही गावी गेली. यावेळी भदोही गावतील नागरिकांनी आणि ग्रामप्रमुखांनी डिंपल हिचे जोरदार स्वागत करून डिंपल गावची सून असल्याचे सांगत तिला पाठिंबाही दिला.
गावकर्याीच्या मदतीने डिंपल हिने महिला कुंटुब न्यायालयात खासगी केस दाखल केली आहे. १२ डिंसेंबर २0१२ रोजी डिंपल ही उल्हासनगरात परत येताच संभाजी चौकात फटाक्याची आतिषबाजी करून तिचे स्वागत करण्यात आले.