आधी फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार

 छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. आधी फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना पुढे आलेय. याप्रकरणी एका इंजिनिअर तरुणाला पोलिसांनी अटक केली.

Updated: Aug 13, 2014, 06:13 PM IST
आधी फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार title=

रायपूर:  छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. आधी फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना पुढे आलेय. याप्रकरणी एका इंजिनिअर तरुणाला पोलिसांनी अटक केली.

फेसबुकच्यामाध्यमातून आधी मैत्री केली. मैत्रीच्या गाठीभेटी वाढत गेल्या. त्यानंतर दोघांमधील प्रेम फुलले. हिमांशु नायक या इंजिनिअर तरुणांने लग्नाची तरुणीला आश्वासन दिले. लग्न करणार असल्याने तरुणीशी संबंध ठेवले. त्यानंतर तरुणाने त्या तरुणीला टाळण्याचा प्रयत्न केला. तिचे फोन घेणे बंद केले. त्यामुळे तरुणींने त्याचा पत्ता शोधून काढला. तो तिच्याच मोहल्यात राहत होता. ती थेट त्याच्या घरी गेली. आपल्या लग्नाबाबत काय, अशी विचारणा केल्यानंतर हिमांशु नायक यांने नकार दिला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरुणीनीने रायपूरमधील डीडी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दीनदयाल नगर पोलिसांनी हिमांशु नायक याला अटक केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.