व्हायरल व्हिडिओ : कुत्र्याची LIVE कार्यक्रमात एन्ट्री

न्यूजरुममध्ये लाईव्ह कार्यक्रमात अनेकदा गंमतीदार गोष्टी घडत असतात. मात्र, परिस्थिती कशी हाताळायची हे अँकरला समजलं नाही, तर मात्र प्रेक्षकांना भलत्याच गोष्टी पाहाव्या लागतात.

Updated: May 25, 2017, 08:26 AM IST
व्हायरल व्हिडिओ : कुत्र्याची LIVE कार्यक्रमात एन्ट्री title=

मुंबई : न्यूजरुममध्ये लाईव्ह कार्यक्रमात अनेकदा गंमतीदार गोष्टी घडत असतात. मात्र, परिस्थिती कशी हाताळायची हे अँकरला समजलं नाही, तर मात्र प्रेक्षकांना भलत्याच गोष्टी पाहाव्या लागतात.

असाच एक किस्सा घडलाय एक रशियन चॅनलच्या न्यूजरूममध्ये... लाईव्ह बुलेटिन सुरू असतानाच एक कुत्रा स्टुडिओमध्ये शिरला आणि थेट अँकरच्या बाजुला जाऊन त्यानं टेबलावर चढण्याचा प्रयत्न केला... या सगळ्या गोंधळानं पहिल्यांदा गडबडून गेलेल्या अँकरला दुसऱ्या क्षणी आपलं हसू आवरणं मात्र कठिण झालं... आणि हा गंमतीदार प्रसंग सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळाला. 

महिला अँकरच्या लॅब्रॅडॉर जातीच्या या कुत्र्याचं नाव आहे 'इन्व्हॅडर'... थोड्याच कालावधीत हा कुत्रा सोशल वेबसाईटवर हीट ठरलाय. का तो तुम्हीच पाहा...