सावधान ! वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्यात या गोष्टीचा धोका

कोणतंही अॅप जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करता तेव्हा तो तुमच्याकडे अनेक गोष्टींची परवानगी मागतो तेव्हा आपण काहीही न वाचता ते कन्फर्म करतो आणि अॅप इंस्टॉल करतो. असं कधी नसेल झालं की तुम्ही परमिशन लिस्ट पाहून अॅप डाऊनलोड किंवा इंस्टॉल नसेल केलं. तुम्ही त करताच. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

Updated: May 9, 2016, 04:55 PM IST
सावधान ! वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्यात या गोष्टीचा धोका title=

मुंबई : कोणतंही अॅप जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करता तेव्हा तो तुमच्याकडे अनेक गोष्टींची परवानगी मागतो तेव्हा आपण काहीही न वाचता ते कन्फर्म करतो आणि अॅप इंस्टॉल करतो. असं कधी नसेल झालं की तुम्ही परमिशन लिस्ट पाहून अॅप डाऊनलोड किंवा इंस्टॉल नसेल केलं. तुम्ही त करताच. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

अॅप आणि मोबाइल कॉमर्स कंपनींनी या सगळ्यातून बिजनेस करण्याचा मार्ग शोधून काढलाय. जेव्हा तुम्ही खरेदी करण्याच्या विचारात असता तेव्हा तुमचा ईमेल, मोबाइलची माहिती ई-कॉमर्स कंपनीकडे जाते. जेव्हा तुमची खरेदी पूर्ण होते तेव्हा तुमची क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती ई-कॉमर्स कंपनीकडे जाते. यामुळे ते तुमच्यावर खूप सहज नजर ठेवू शकता आणि तुमची पसंद नापसंद जाणून घेऊ शकता.

अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही अॅप डाउनलोड करता तेव्हा देखील तुमचा फोन नंबर, ईमेल आणि इतर माहिती अॅपच्या माध्यमातून त्या कंपनीकडे पोहोचते. जेव्हा तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर काहीतरी खरेदी करण्याचा विचार करत असता यावर ही त्या कंपनीची नजर असते.

तुमच्या डिव्हाईसच्या इंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेसवरुन वेबसाइटला तुमची पंसद माहित पडते आणि तो तुम्हाला त्याच प्रकारच्या वस्तू दाखवतो. तुमच्या फोनवर जर बॅंकेचे मॅसेज येत असतील तर तुमच्या अकांऊटमध्ये किती पैसे आहे हे देखील अॅपच्या माध्यमातून कंपनीकडे पोहोचते. अशा प्रकारे तुमचं एक प्रोफाईल तयार होतं आणि तुमची सगळी माहिती या कंपन्यांना मिळत असते. त्यामुळे कोणतंही अॅप डाऊनलोड करतांना तुम्ही कोणत्या वेबसाईटवरुन ते डाऊनलोड करताय किंवा कोणतं अॅप तुम्ही डाऊनलोड करताय हे देखील महत्त्वाचं आहे.