मुंबई : स्मार्टफोन युजरची सध्या चलती दिसून येत आहे. रिलायन्स जिओने इंटरनेट टेडासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. त्यामुळे अन्य कंपन्यांनी आपल्या इंटरनेटमध्ये मोठी कपात केली. आता डेटाविंड या कंपनीने १४९९च्या स्मार्टफोन सोबत वर्षभर इंटरनेट फ्री देण्याचे जाहीर केलेय.
डेटाविंडने टॅबमध्ये जम बसविल्यानंतर आता स्मार्टफोनमध्ये उडी घेतली आहे. भारतात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी स्मार्टफोन लॉंच केलाय. या कंपनीचा स्मार्टफोन चक्क १४९९ रुपयात मिळणार असून सोबत वर्षभर मोफत इंटरनेट डाटा मिळणार आहे.
डेटाविंडच्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर चारणाऱ्या पॉकेटसर्फर जीझेडची किंमत केवळ १४९९ रुपये आहे. त्यांची रिलायन्सशी भागीदारी असल्याने ग्राहकांना एक वर्ष मोफत इंटरनेट सुविधा मिळणार आहे. तसेच डेटाविंडने चार स्मार्टफोन बाजारात आणलेत. यांची किंमत २४९९ ते ५९९९ रुपयांदरम्यान आहे.