अवघ्या ९९९ रुपयांमध्ये आता मिळणार स्मार्टफोन, १ वर्ष इंटरनेटही फ्री

आता आपला स्मार्टफोन खरेदीचं स्वप्न सत्यात उतरू शकतं. कारण अवघ्या ९९९ रुपयांमध्ये आता स्मार्टफोन मिळणार आहे. मोबाईल फोन आणि टॅबलेट बनवणारी कंपनी 'डेटा विंड' आणि रिलायंसनं सोबत मिळून या वर्ष अखेरीस असा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे, ज्यात इतर स्मार्टफोन्स सारखे फीचर्स तर असतीलच... पण या फोनची किंमत अवघी ९९९ रुपये असेल.

Updated: Oct 28, 2015, 12:14 PM IST
अवघ्या ९९९ रुपयांमध्ये आता मिळणार स्मार्टफोन, १ वर्ष इंटरनेटही फ्री  title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई: आता आपला स्मार्टफोन खरेदीचं स्वप्न सत्यात उतरू शकतं. कारण अवघ्या ९९९ रुपयांमध्ये आता स्मार्टफोन मिळणार आहे. मोबाईल फोन आणि टॅबलेट बनवणारी कंपनी 'डेटा विंड' आणि रिलायंसनं सोबत मिळून या वर्ष अखेरीस असा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे, ज्यात इतर स्मार्टफोन्स सारखे फीचर्स तर असतीलच... पण या फोनची किंमत अवघी ९९९ रुपये असेल.

या स्मार्टफोनमध्ये लीनएक्स आधारित ऑपरेटिंग सिस्टम असेल आणि रिलायंस यासोबत अनेक सुविधा देणार आहे. रिलायंसचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या जन्मदिनी म्हणजेच २८ डिसेंबरला हा फोन बाजारात येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा - दिवाळीला लेनोवो आणतोय सर्वात जबरदस्त स्मार्टफोन!

डेटा विंडचे सीईओ सुनीत सिंह तुली यांनी सांगितलं की, आमचं लक्ष्य १००० रुपयांच्या आता लोकांना जबरदस्त स्मार्टफोन पोहोचवणं आहे. या फोनसोबत ग्राहकांना १२ महिने इंटरनेट फ्री मिळेल. तुली पुढे म्हणाले, आमचं पूर्ण लक्ष नेटवर्क सेवा, अॅप्लिकेशन्स आणि कंटेटवर आहे.

डेटा विंड आणि रिलायंस आतापर्यंत अँड्रॉईडवर आधारित स्मार्टफोन आणि टॅबलेटचे सात वॅरिएंट्स विकत आहेत. दोघांनी मिळून गेल्या सहा महिन्यांमध्ये ४ लाखांहून अधिक डिवाइस विकले. 

आणखी वाचा - लवकरच, दाखल होतोय जगातला सुपरफास्ट स्मार्टफोन!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.