स्क्रीनला तडे गेलेले आयफोनही अॅपल परत घेणार

आयफोनने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणलीये. तुमच्या आयफोनच्या स्क्रीनला तडे गेलेत का? मग आता टेन्शन घ्यायची गरज नाही. आयफोन असे फोन परत घेणार आहे. 

Updated: Feb 9, 2016, 08:25 AM IST
स्क्रीनला तडे गेलेले आयफोनही अॅपल परत घेणार title=

नवी दिल्ली : आयफोनने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणलीये. तुमच्या आयफोनच्या स्क्रीनला तडे गेलेत का? मग आता टेन्शन घ्यायची गरज नाही. आयफोन असे फोन परत घेणार आहे. 

यापूर्वी ज्या आयफोनची स्क्रीन आणि बटणे सुस्थितीत असतील तेच फोन परत घेतले जायचे मात्र आता तुटलेले-फुटलेले फोनही अॅपल परत घेणार आहे.

टेक ब्लॉक 9टू5मॅकच्या रिपोर्टनुसार, ज्या कस्टमर्सना आपला आयफोन अपग्रेड करायचा आहे त्यांच्या आयफोनची स्क्रीन तुटलेली असेल बटणे तुटलेले असेल तरीही ते अॅपल स्टोरमध्ये फोन देऊ शकतात. 

आयफोन ५ आणि त्यापुढील मॉडेलसाठी कंपनीने हा नवा नियम लागू केलाय. यामुळे अनेक जण आयफोन खरेदी करण्यास प्रोत्साहित होतील असा कंपनीचा दावा आहे. कंपनीचे प्रवक्ते निक लीही यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.