ऑनलाईन शॉपिंगवर गाईच्या शेणाचा विक्रमी खप

ऑनलाईन शॉपिंग म्हणजे सध्या खरेदीचा एक सुलभ पर्याय आणि याच ऑनलाईन शॉपिंगवर एक नवं आणि अनोखं प्रोडकक्ट लाँच झालंय. गाईचं शेणं... ऐकून चक्रावलात पण हे खरंय.. एमेझॉन डॉट कॉम या आनलाईन शॉपिंगसाईटवर सध्या गोव-या अर्थात गाईच्या शेणाचा विक्रमी खप सरु आहे.

Updated: Dec 27, 2015, 11:49 AM IST
ऑनलाईन शॉपिंगवर गाईच्या शेणाचा विक्रमी खप  title=

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग म्हणजे सध्या खरेदीचा एक सुलभ पर्याय आणि याच ऑनलाईन शॉपिंगवर एक नवं आणि अनोखं प्रोडकक्ट लाँच झालंय. गाईचं शेणं... ऐकून चक्रावलात पण हे खरंय.. एमेझॉन डॉट कॉम या आनलाईन शॉपिंगसाईटवर सध्या गोव-या अर्थात गाईच्या शेणाचा विक्रमी खप सरु आहे.

हॉट केक्स प्रमाणे सध्या या साईटवर गोव-यांची विक्री होतीये. दिल्लीतील प्रीती शर्मा यांना ही आयडियाची कल्पना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात साकारलीय. एकाच आकाराच्या एकाच वजनाच्या गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोव-या सध्या एमेझॉन डॉट कॉमवर तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. 

419 रुपये किंमतीला गोव-यांचं हे पॅकेट विक्रीसाठी ठेवण्यात आलंय आणि त्याला शहरी भागातून मोठी मागणी मिळतीये.. आतापर्यंत 3 हजारांहून अधीक पॅकेट्सची विक्री झाल्याची माहिती प्रीति शर्मा यांनी दिलीये.. या गोव-यांचा वापर पूजा साहित्य म्हणून या गोव-यांना मोठी मागणी आहे.