हा धक्कादायक फोटो पाहून अनेकांना बसत नाही आपल्या डोळ्यांवर विश्वास

 आपण सयामी किंवा शरीर जुळलेल्या व्यक्ती पाहिल्या असती. पण सध्या सोशल मीडियावर असा एक फोटो फिरतोय त्याने अनेकांची झोप उडवली आहे. हा फोटो खूप व्हायरल होत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 13, 2017, 07:01 PM IST
हा धक्कादायक फोटो पाहून अनेकांना बसत नाही आपल्या डोळ्यांवर विश्वास  title=

मुंबई :  आपण सयामी किंवा शरीर जुळलेल्या व्यक्ती पाहिल्या असती. पण सध्या सोशल मीडियावर असा एक फोटो फिरतोय त्याने अनेकांची झोप उडवली आहे. हा फोटो खूप व्हायरल होत आहे. 

हा फोटो पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसत आहे. या फोटोमध्ये एक तरुणी जमिनीवर बसलेली आहे. फोटो-शेअरिंग वेबसाइट Imgur वर AMassiveTRexHoldingaBaby नावाने एका युझरने हा फोटो शेअर केला आहे. ९ जानेवारी रोजी हा फोटोग्राफ पोस्ट केला होता आणि आतापर्यंत तब्बल ३ लाखांहून अधिक नागरिकांना हा फोटो पाहिला आहे.

व्हायरल होत असलेल्या या फोटोग्राफसोबत कॅप्शन लिहिलं आहे की, “या फोटोला निरखून पाहत राहणे स्वाभाविक आहे कारण, मलाही पूर्ण १ मिनिट लागला की नेमका हा प्रकार आहे तरी काय”. हा फोटो पाहिल्यानंतर दिसतं की, जमिनीवर एक लडकी बसलेली आहे आणि या तरुणीचे पाय सामान्य नागरिकांप्रमाणे नसून तिला तीन पाय असल्याचे दिसत आहे.  

हा फोटो एकदा पाहिल्यावर समजत नाही. त्यामुळे लोक अनेकवेळा हा फोटो पाहत आहेत. 

जाणून घ्या या फोटोचं सत्य

या फोटोमध्ये नेमकं काय आहे हे तुम्ही शोधू शकला नाहीत? तुम्ही गोंधळून गेलात? मग, काळजी करू नका आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या फोटो मागचं सत्य… हा फोटो पहिल्यांदा पाहिल्यानंतर प्रत्येकालाच वाटते की जमिनीवर बसलेल्या या मुलीला एकूण तीन पाय आहेत. मात्र, तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला कळेल की, त्या तरुणीला तिसरा पाय नाहीये तर त्या तरुणीने आपल्या हातांमध्ये एक फुलदाणी पकडलेली आहे. 

ही फुलदाणी तीने आपल्या पायांजवळ ठेवली आहे आणि त्या फुलदाणीच्या रंगामुळे ती फुलदाणी म्हणजे त्या तरुणीचा तिसरा पाय असल्याचं अनेकांना वाटत आहे.