'जिओ'ला टक्कर देण्यासाठी BSNLची नवी योजना

सरकारी टेलिकॉम निगम कंपनी BSNLने मोठी घोषणा केलेय. एक रुपायापेक्षा कमी किमतीत 1 जीबी डाटा देणार आहे.

Updated: Sep 3, 2016, 03:01 PM IST
'जिओ'ला टक्कर देण्यासाठी BSNLची नवी योजना title=

मुंबई : 50 रुपयांत 1 जीबी 4 जी डाटा देण्याचा दावा रिलायन्सच्या जिओने केलाय. सोमवारपासून ही योजना कार्यन्वीत होणार आहे. मात्र, सरकारी टेलिकॉम निगम कंपनी BSNLने मोठी घोषणा केलेय. एक रुपायापेक्षा कमी किमतीत 1 जीबी डाटा देणार आहे.

बीएसएनएल 9 सप्टेंबरपासून ब्रॉडब्रॅंडच्या नव्या ग्राहकांना अनलिमिटेड  बीबी-249 प्लान लॉन्च केला आहे. या योजनेनुसार 249 रुपयांत 300 जीबीपर्यंत डाटा डाऊनलोड करता येणार आहे. विशेषबाब म्हणजे या 249 रुपयांत 300 जीबीचा डाटा तुम्ही सहा महिने लाभ घेऊ शकता. मात्र, सुरुवातीला 1 एमबीपीएस स्पीड मिळेल. हा 1 जीबीसाठी असेल. त्यानतर एक एबबीपीएसचा स्पीड मिळणार आहे.

BSNL अधिकाऱ्या माहितीनुसार बीएसएनएलकडे 2 कोटी ग्राहकांकडे ब्रॉडबॅंड जोडणी आहे. मात्र, जिओची सेवा खूप जलद आहे. बीएसएनएलच्या योजनेत थोडी मर्यादा आहे. बीएसएनएल 2 एमबीपीएसची स्पीड आहे. तर जिओकडे फोटो डाऊनलोड करण्यासाठी 135 एमबीपीएसचा स्पीड देण्याचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे अन्य टेलिकॉम कंपनी अधिक स्वस्त डाटा प्लान देण्याची शक्यता आहे.