कोलकाता: पश्चिम बंगालच्या वीरभूमी जिल्ह्यात एका कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान ब्लू टूथद्वारे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आलंय. त्या विद्यार्थ्यांनं आपल्या नकली केसांमध्ये ब्लू-टूथ लपवलं होतं.
बर्धवान विश्वविद्यालयमध्ये दर्शनशास्त्रातून बीए करणारा रफीकुल इस्लाम पार्ट-१चा विद्यार्थी आहे. सूरी विद्यासागर कॉलेजमध्ये तो विग घालून परीक्षा द्यायला पोहोचला. कॉलेजचे प्रधानाध्यापक एल. एन. मंडल यांनी सांगितलं की, परीक्षकांना वाटलं की रफीकुल विग लावून आलाय. त्यांनी रफीकुलला मोठ्या आवाजात बोलतांनाही ऐकलं. पर्यवेक्षकाने रागवल्यानंतर विद्यार्थ्यानं त्याचे नकली केस काढले. तर त्यात ब्लू-टूथ लागलेला होता.
ते उपकरण त्याच्या मोबाईलशी जोडलेलं होतं. ज्याद्वारे तो एका सहकाऱ्यासोबत बोलत होता आणि प्रश्नांची उत्तरं विचारत होता.
या विद्यार्थ्याला रस्टिकेट करण्यात आलंय. बर्धवान विश्वविद्यालयाकडून या बातमीची स्पष्टता करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.