स्मार्टफोन अधिक 'स्मार्ट' बनवणारे पाच अॅप्स!

एका फोनला स्मार्ट त्याचे फीचर्स आणि अॅप्स बनवतात. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर गूगल प्ले स्टोअरच्या रुपात तुमच्याजवळ अॅप्सचा साठा आहे. अॅप्सच्या याच साठ्यातील असे पाच चांगले अॅप्स आहेत जे तुम्हाला योग्य दिशा देतात.

Updated: May 17, 2015, 05:41 PM IST
स्मार्टफोन अधिक 'स्मार्ट' बनवणारे पाच अॅप्स! title=

मुंबई: एका फोनला स्मार्ट त्याचे फीचर्स आणि अॅप्स बनवतात. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर गूगल प्ले स्टोअरच्या रुपात तुमच्याजवळ अॅप्सचा साठा आहे. अॅप्सच्या याच साठ्यातील असे पाच चांगले अॅप्स आहेत जे तुम्हाला योग्य दिशा देतात.

 नेव्हिगेशन अॅप्स हे मार्गदर्शक म्हणून काम करतात. इंटरनेट कनेक्शन नसल्यानं हे अॅप्स नीट काम करत नाही. पण जर अशी अडचण आली तर त्यावर उपाय हा ऑफलाइन अॅप्समध्येच Offline Apps आहे. होय पाच असे ऑफलाइन नेव्हिगेशन अॅप्स आहेत जे इंटरनेटशिवाय तुम्हाला योग्य रस्ता दाखवू शकतात.

HERE Maps
याआधी हे अॅप फक्त नोकिया फोन युजर्ससाठीच होतं. पण आता हे अँड्रॉइडसाठी उपलब्ध आहे. हे अॅप प्रत्येक वेळी तुम्हाला व्हॉइस गाइड देतं. यामध्ये १००हून अधिक देशांचे नकाशे सेव्ह करुन ते भविष्यात ऑफलाइन वापरता येऊ शकतात. ४० पेक्षा अधिक देशांमध्ये हे अॅप रिअल टाइम ट्रॅफिकची सुविधा देतं.
 
Co-Pilot GPS - Plan & explorer
ऑफलाइन नेव्हिगेशन अॅपच्या श्रेणीत आणखी एक चांगलं अॅप म्हणजे 'Co-Pilot GPS'. या अॅपमध्ये रेस्टॉरंट, मल्टिप्लेक्स, कॉफी शॉप यांची माहिती मिळू शकते. ड्रायव्हरच्या सुविधेसाठी 3D गायडन्स डिसप्ले आहे. रिअल टाइम ट्रॅफिक, ऑटोमॅटिक रुटिंगसारखी सुविधा आहे.
 
MAPS.ME - offline maps
३४५ हून अधि‍क देशांमध्ये ऑफलाइन रुटगाईडच्या रुपातील 'MAPS.ME' एक चांगलं अॅप आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे यात प्रत्येक ठिकाणांचे लँडमार्क, पॉईंट ऑफ इंटरेस्ट, प्रत्येक गल्ली, चौकाचौकाची माहिती देण्यात आली आहे. हे अॅप जवळपास दररोज अपडेटही होतं.
 
GPS Navigation & Maps by Sygic

सर्वात लोकप्रिय नेव्हिगेशन अॅपमध्ये याचा समावेश होतो. या अॅपमध्ये क्रॉस बॉर्डर रुटिंगची सुविधा आहे. म्हणजेच देशाबाहेर गेल्यावर तुम्ही कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन देशाचं नाव बदलण्याचीही गरज नाही. पॉईंट ऑफ डेस्टि‍नेशन, फ्री मॅप अपडेट्स, व्हॉईस नेव्हिगेशन यांसारख्या सुविधाही यात आहे.
 

MapFactor: GPS Navigation
सर्वात लोकप्रिय नेव्हिगेशन अप्समध्ये दुसऱ्या क्रमांकाचं अॅप आहे 'MapFactor'. हे अॅप क्रॉस बॉर्डर रुटिंगसह तुम्हाला डोअर टू डोअर रुट प्लॅन देतं. यामध्ये 2D आणि 3D मोड आहेत, ज्याचा वापर युजर त्यांच्या सोयीनुसार करु शकतात. याशिवाय दिवस आणि रात्रीसाठी विविध कलर मोडची सुविधाही यात आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.