फेसबूकवर पसरतोय हा व्हायरस

सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर सध्या एक व्हायरस पसरत आहे. माय फर्स्ट व्हिडिओ या नावानं हा व्हिडिओ तुमच्या अकाऊंटवर येतो.

Updated: Apr 8, 2016, 07:06 PM IST
फेसबूकवर पसरतोय हा व्हायरस title=

मुंबई: सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर सध्या एक व्हायरस पसरत आहे. माय फर्स्ट व्हिडिओ या नावानं हा व्हिडिओ तुमच्या अकाऊंटवर येतो. या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तुमच्या फ्रेंड लिस्टमधले मित्र यात टॅग होतात, आणि त्यांच्यापर्यंत हा व्हायरस पोहोचतो. 

तुम्हालाही अशी लिंक आली असेल तर यावर क्लिक करु नका. जर तुम्ही आधीच या लिंकवर क्लिक केलं असेल तुमच्या ब्राऊजरच्या एक्सटेंशनमध्ये जाऊन हा व्हायरस डिलीट करा आणि प्रोफाईल पेजवर जाऊन टॅग केलेल्या पोस्टही डिलीट करा. 

यानंतर काही वेळानंतर फेसबूककडून तुम्हाला रिव्ह्यू मेसेज मिळेल आणि सिस्टीम स्कॅन झाल्यावर तुम्ही पुन्हा एकदा फेसबूक वापरू शकता.