कम्प्युटरमध्ये ब्रेन करा अपलोड व्हा 'अमर'!

टेक्नॉलॉजीच्या जगतात मिनिटा-मिनिटाला बदल होत असतात.... काही नव्या कल्पना आकाराला येत असतात... पण, आता मात्र असं काही घडतंय ज्याची कधी कुणी कल्पनाही केली नसेल. 

Updated: Jun 21, 2016, 11:40 PM IST
कम्प्युटरमध्ये ब्रेन करा अपलोड व्हा 'अमर'! title=

नवी दिल्ली : टेक्नॉलॉजीच्या जगतात मिनिटा-मिनिटाला बदल होत असतात.... काही नव्या कल्पना आकाराला येत असतात... पण, आता मात्र असं काही घडतंय ज्याची कधी कुणी कल्पनाही केली नसेल. 

express.co.uk या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, भौतिक वैज्ञानिक डॉ. मिशिओ काकू यांनी एक अशी टेक्नॉलॉजी आकाराला आणलीय ज्यामुळे मनुष्याला 'अमरत्व' प्राप्त होऊ शकेल. 

कसं शक्य आहे हे... 

या टेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं व्यक्ती मरण्यापूर्वी आपली पर्सनॅलिटी कम्प्युटरमध्ये अपलोड करून एक 'अवतार' तयार करू शकेल. व्यक्तीच्या सगळ्या आठवणी यात समावल्या जाऊ शकतील. व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या 'अवतारा'ला अॅक्टिवेट केलं जाऊ शकेल. 

कसं करणार हा 'अवतार' काम

हा अवतार 'आर्टीफिशियल इंटेलिजन्स'च्या साहाय्यानं इतर व्यक्तींशी संवाद साधू शकतील. यामध्ये व्यक्तीचं व्हिजुअल परसेप्शनही सामील केलं जाऊ शकेल. भविष्यात एखाद्या 'रोबोट'प्रमाणे हा अवतार काम करू शकेल. 

तुम्ही तुमच्या आप्तेष्टांशी मेल्यानंतरही संवाद साधू शकाल जसं काही तुम्ही जिवंतच आहात. हा दावा डॉ. काकू यांनी www.curiositystream.com या इंटरनेट चॅनलसाठी केलेल्या एका डॉक्युमेंटरीमध्ये केलाय.