विना ड्रायव्हर गूगल कार चक्क बसला धडकली

गूगलने मोठा गाजावाजा करत स्वयंचलीत कार बाजारात उतविण्याचा विडा उचलला. विना ड्रायव्हर कार रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाली. या कारचे प्रात्यक्षिक यशस्वी झाले. मात्र, गूगलची ही कार रस्त्यावरुन जाताना एका बसला धडकली आणि अपघात झाला.

Reuters | Updated: Mar 1, 2016, 11:32 AM IST
विना ड्रायव्हर गूगल कार चक्क बसला धडकली title=
छाया : एपी

कॅलिफोर्निया : गूगलने मोठा गाजावाजा करत स्वयंचलीत कार बाजारात उतविण्याचा विडा उचलला. विना ड्रायव्हर कार रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाली. या कारचे प्रात्यक्षिक यशस्वी झाले. मात्र, गूगलची ही कार रस्त्यावरुन जाताना एका बसला धडकली आणि अपघात झाला.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे कारने रस्त्यावरुन जात असताना एका बसला ठोकर दिली. ही कार स्वत:हून चालते. हा कारचा पहिला अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे. गूगल मुख्यालयाजवळ दोन आठवड्यांपूर्वी अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विना ड्रायव्हर कार चालली असताना बसच्या बाजूने धडक दिली. ही कार ताशी ३ किलो मीटर वेगाने चालली होती. बस येत असताना कार स्लो होती. त्यामुळे बस निघून जाईल असे कारमधील बसलेल्या व्यक्तीला वाटले. मात्र, तो संगणक जवळ न घेतला नाही. किंवा संगणकाच्या मदतीने कारवर नियंत्रण मिळवले नाही. त्यामुळे ही कार बसला धडकली.