फेसबूक ऑफिसमध्ये पेंटिंग काढणारा झाला १२०० कोटींचा मालक

 फेसबूकशी सुरूवातीपासून जोडले गेलेल्या व्यक्तींची आज चांदी झाली आहे. फेसबूक इनकॉरपोर्रेशनच्या ऑफिसमध्ये कलाकृती पेंट करणारा डेव्हीड चो आता कोट्यधिश झाला आहे. त्याने पेंटिंग काढण्यासाठी कंपनीचे काही शेअर्स मिळाले होते. आता त्या शेअरची किंमत २० कोटी डॉलर म्हणजे १२०० कोटी रूपये झाली आहे. 

Updated: Jun 11, 2015, 07:39 PM IST
फेसबूक ऑफिसमध्ये पेंटिंग काढणारा झाला १२०० कोटींचा मालक title=

न्यू यॉर्क :  फेसबूकशी सुरूवातीपासून जोडले गेलेल्या व्यक्तींची आज चांदी झाली आहे. फेसबूक इनकॉरपोर्रेशनच्या ऑफिसमध्ये कलाकृती पेंट करणारा डेव्हीड चो आता कोट्यधिश झाला आहे. त्याने पेंटिंग काढण्यासाठी कंपनीचे काही शेअर्स मिळाले होते. आता त्या शेअरची किंमत २० कोटी डॉलर म्हणजे १२०० कोटी रूपये झाली आहे. 

'वैल्युवॉक डॉट कॉम'ने दिलेल्या बातमीनुसार डेव्हीड चोने या कामासाठी ६० हजार डॉलर मागितले होते. एक स्टार्टअप कंपनी म्हणून फेसबूक ही रक्कम देणे शक्य नव्हते. त्यामुळे चो याने आपल्या कामाचे पैसे शेअरच्या रूपात घेतले होते. यासाठी फेसबूकचा फाउंडर प्रेसिडेंट शीन पार्कर याने मनविले होते. 

चो याने सांगितले की तेव्हा पार्कर एक सडपातळ शिकणारा मुलगा होता. त्याला पार्करने सांगितले की कंपनीसाठी तो गुंतवणूकदार शोधतो आहे. त्यावेळी फेसबूकच्या शेअरची किंमत कवडीमोल होती. पण चो याने पार्करवर विश्वास ठेवला की तो काही तरी मोठे करणार आहे. 

पार्करची मेहनत फळाला आली  फेसबूकमध्ये पेपालचे को-फाऊंडर पीटर थील आणि लिंकडइन कॉर्पोरेशनचे को फाउंडर रीड हॉफमॅन यांनी गुंतवणूक केली. चो याने सांगितले की मला पार्करवर विश्वास होता, फेसबूकशी काही संबंध नव्हता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.