गुड न्यूज: आज रात्री भारतात लॉन्च होतोय अॅपल आयफोन 6

अॅपल आज जगासमोर त्याचा सर्वात अवेटेड स्मार्टफोन अॅपल आयफोन 6 कॅलिफोर्नियामध्ये रात्री 10.30 वाजता लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीनं एका मोठ्या इव्हेंटचं आयोजन केलंय.  

Updated: Sep 9, 2014, 02:38 PM IST
गुड न्यूज: आज रात्री भारतात लॉन्च होतोय अॅपल आयफोन 6 title=

मुंबई: अॅपल आज जगासमोर त्याचा सर्वात अवेटेड स्मार्टफोन अॅपल आयफोन 6 कॅलिफोर्नियामध्ये रात्री 10.30 वाजता लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीनं एका मोठ्या इव्हेंटचं आयोजन केलंय.  

अॅपलच्या पहिल्या आयफोन्सच्या तुलनेत अॅपल आयफोन 6ची स्क्रीन मोठी असेल, असं बोललं जातंय. याद्वारे कंपनी पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. अॅपलच्या या आयफोनकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. 

आयफोन 6बद्दल अनेक अफवा पसरल्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ पण लीक झाले. त्यामुळं ग्राहकांना थोडासा अंदाज आला. आतापर्यंतच्या सर्व बातम्यांनुसार यात ios8 ऑपरेटिंग सिस्टिम असेल. सोबतच त्यात 13 ते 14 मेगापिक्सेलपर्यंत कॅमेरा सुद्धा असू शकतो. 

अॅपलच्या आयफोन 6 बद्दल आलेल्या बातम्यांनुसार आयफोन 6चे दोन व्हॅरियंट एक 5.5 इंच डिस्प्ले आणि दुसरा 4.7 इंच डिस्प्लेसह असेल. 

बोललं जातंय की, अॅपलचा हा स्मार्टफोन कोरियन स्मार्टफोन कंपनी सॅमसंगच्या नोट3 फॅबलेटला ज्याचा डिस्प्ले 5.7 इंच आहे, त्याला टक्कर देणार आहे. तेव्हा आता सर्वांना वाट आहे ती अॅपल आयफोन 6ची... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.