'मी गे असल्याचा मला अभिमान' - ऍपलचे सीईओ

सुप्रसिद्ध आणि नामांकित 'ऍपल' कंपनीचे सर्वेसर्वा टीम कुक यांनी, मी, 'गे' असल्याचा मला अभिमान आहे, अशी माहिती  एका लेखातून दिलीय. कुक यांनी ब्लुमबर्ग बिझनेसवीकमध्ये गुरूवारी लेख लिहून 'गे' असल्याचा जाहीर खुलासा केला आहे. 

Updated: Oct 30, 2014, 06:30 PM IST
'मी गे असल्याचा मला अभिमान' - ऍपलचे सीईओ title=

न्यूयॉर्क : सुप्रसिद्ध आणि नामांकित 'ऍपल' कंपनीचे सर्वेसर्वा टीम कुक यांनी, मी, 'गे' असल्याचा मला अभिमान आहे, अशी माहिती  एका लेखातून दिलीय. कुक यांनी ब्लुमबर्ग बिझनेसवीकमध्ये गुरूवारी लेख लिहून 'गे' असल्याचा जाहीर खुलासा केला आहे. 

कुक म्हणाले, 'माझ्या लैंगिकताबाबत आजपर्यंत कधीही खुलासा केला नव्हता. परंतु, माझ्या कंपनीतील काही सहकाऱ्यांना याबाबत माहिती होती. वैयक्तिक माहिती काही कारणास्तव जाहीर केली नव्हती. 'गे' असल्याचा मला अभिमान आहे. शिवाय, देवाने मला दिलेली ही मोठी भेट आहे.'

'ऍपल' कंपनीमध्ये सहकाऱयांसोबत काम करायची संधी मिळाली हे मोठे भाग्य आहे. सहकाऱ्यांनी काम करताना मोठा पाठिंबा दिला आहे. यापुढेही कंपनीमध्ये मोठे काम करण्यावरच लक्ष राहणार आहे. शिवाय, 'गे'साठी काम करणार असल्याचंही कुक यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.