मुंबई : एम्ब्रेन या कंपनीनं P-2000 पॉवर बँक लॉन्च केली आहे. या पॉवर बँकची क्षमता 20,800 mAh एवढी आहे. ही पॉवर बँक 1,699 रुपयांना मिळणार आहे. एवढी क्षमता असलेली ही सगळ्यात स्वस्त पॉवर बँक असल्याचं बोललं जात आहे.
ही पॉवर बँक मोबाईल स्टोअर्सबरोबरच स्नॅपडील, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि Paytmवरही उपलब्ध आहे. या पॉवर बँकमध्ये टॉर्च लाईट, LED इंडिकेटर्स हे देखील फिचर्स आहेत. त्यामुळे नवीन पॉवर बँक विकत घ्यायची असेल तर तुम्ही याचा विचार नक्कीच करु शकता.