ही कंपनी ग्राहकांना देणार फ्री इंटरनेट डेटा

टेलिकॉम कंपन्यांमधली स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

Updated: Apr 4, 2017, 10:45 PM IST
ही कंपनी ग्राहकांना देणार फ्री इंटरनेट डेटा  title=

मुंबई : टेलिकॉम कंपन्यांमधली स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता तर एअरसेल ग्राहकांना फुकटात इंटरेनेट सुविधा देणार आहे. एअरसेलच्या प्रिपेड यूजर्सना पहाटे तीन ते पाच या वेळेमध्ये हे फ्री इंटरनेट वापरता येणार आहे. एअरसेलची ही गुड नाईट ऑफर 3G आणि 2G ग्राहकांसाठी आहे. एअरसेलची ही ऑफर दोन महिन्यांसाठी आहे. 

भारतातला वाढता स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर पाहता आम्ही एअरसेल गुडनाईट ऑफर घेऊन आलो आहे, अशी प्रतिक्रिया एअरसेलचे अधिकारी अनुपम वासुदेव यांनी दिली आहे. या ऑफरमुळे ग्राहक फुकटात इंटरनेट सर्फिंग, व्हिडिओ, संगीत, चित्रपट पाहू शकतील, असंही वासुदेव म्हणालेत.