'फ्लिपकार्ट'ला ग्राहकानंच लावला 20 लाखांचा चुना!

आत्तापर्यंत तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटनं ग्राहकांना चुना लावल्याच्या बातम्या ऐकल्या असतील पण, पहिल्यांदाच एका ग्राहकानंच शॉपिंग वेबसाईटला जवळपास २० लाखांचा चुना लावल्याची घटना समोर आलीय. 

Updated: Oct 3, 2015, 04:56 PM IST
'फ्लिपकार्ट'ला ग्राहकानंच लावला 20 लाखांचा चुना!  title=

नवी दिल्ली : आत्तापर्यंत तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटनं ग्राहकांना चुना लावल्याच्या बातम्या ऐकल्या असतील पण, पहिल्यांदाच एका ग्राहकानंच शॉपिंग वेबसाईटला जवळपास २० लाखांचा चुना लावल्याची घटना समोर आलीय. 

बंगळुरुमध्ये ही घटना उघडकीस आलीय. वीरा स्वामी नावाची एका ३२ वर्षीय व्यक्ती 'फ्लिपकार्ट'ला जवळपास २० महिन्यांपासून चुना लावत होती. त्यानंतर ही गोष्ट उघडकीस आलीय. 

वनस्थलीपुरममध्ये राहणाऱ्या स्वामीनं आपल्या पत्नी, आई-वड़ील, भाऊ, मुलं इतकंच काय तर शेजाऱ्यांच्याही नावावर 'फ्लिपकार्ट'मधून अनेक सामान ऑर्डर करत होता. सामान मिळाल्यानंतर तो 'रिटर्न पॉलिसी'मध्ये कस्टमर केअरला फोन करून सामान खराब असल्याची तक्रार करत होता. 

तक्रार मिळाल्यानंतर फ्लिपकार्टचा प्रतिनिधी सामान घेण्यासाठी दाखल होत असे... आणि याच वेळेस स्वामी आपली खेळी खेळत असे... यावेळी, स्वामी खऱ्या सामानाच्याऐवजी जुनं किंवा स्वस्त सामान ठेवून ते परत पाठवत होता. 

अधिक वाचा - ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटनं गंडवलं तर काय कराल...

फ्लिपकार्टच्या रिटर्न पॉलिसीनुसार, रिटर्न पॉलिसीनुसार सामान परत मिळाल्यावर फ्लिपकार्ट सामानाची किंमत ग्राहकाला परत देतं. गेल्या २० महिन्यांत स्वामीनं २०० हून जास्त सामानांची खरेदी वेगवेगळ्या नावांनी आणि अकाऊंटनं करून रिटर्नच्या नावावर फ्लिपकार्टला २० लाख रुपयांचा चुना लावल्याचं समोर आलंय. 

...चुना लावण्यातही ग्राहक शॉपिंग वेबसाईटपेक्षा चलाख!
असा अनुभव फ्लिपकार्टलाच आलाय असं काही नाही... इतर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटलाही हा अनुभव आलाय. ग्राहकांनी अनेकदा आयफोन ऑर्डर करून 'रिटर्न पॉलिसी'मध्ये परत पाठवला. पण, यावेळी त्यांनी आयफोनच्या ऐवजी बिस्किटाचे पॅकेटस् आणि विटा परत पाठवल्याच्याही घटना घडल्यात. 

अनेकदा लोक 'कॅश ऑन डिलिव्हरी' अंतर्गत सामान ऑर्डर करतात पण, डिलिव्हरीच्या वेळी 'आम्ही तर सामान ऑर्डरच केलं नव्हतं' असं सांगून टाईमपास करतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.