रंगपंचमी खेळण्याआधी या ९ गोष्टी लक्षात ठेवा

देशात रंगाचा उत्सव म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीत देशभरात रंगाचा उत्साह पाहायला मिळतो. पण हा सण साजरा करत असतांना त्यासाठी वापरण्यात येणारे रंग तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात. तुमच्या त्वचेला हे रंग हानिकारक ठरु शकतात. त्यामुळे रंगपंचमी खेळण्याआधी काही टीप्स नक्की वाचा.

Updated: Mar 12, 2017, 12:33 PM IST
रंगपंचमी खेळण्याआधी या ९ गोष्टी लक्षात ठेवा title=

मुंबई : देशात रंगाचा उत्सव म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीत देशभरात रंगाचा उत्साह पाहायला मिळतो. पण हा सण साजरा करत असतांना त्यासाठी वापरण्यात येणारे रंग तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात. तुमच्या त्वचेला हे रंग हानिकारक ठरु शकतात. त्यामुळे रंगपंचमी खेळण्याआधी काही टीप्स नक्की वाचा.

१. रंगपंचमीच्या दिवशी असे कपडे झाला ज्यामुळे तुमचं शरीर अधिक झाकलेलं असेल. 

२. रंगपंचमी खेळण्यासाठी आणलेला रंग केमिकलयुक्त तर नाही ना याची खात्री करुन घ्या.

३. रंगपंचमी खेळण्याआधी शरीरावर मोहरीचं तेल किंवा लोशन लावून घ्या जेणेकरुन तुमची त्वचेवर मॉश्चुराइजरचं प्रमाण अधिक असेल. यामुळे रंगाचा तुमच्या त्वचेवर परिणाम होणार नाही आणि लवकर निघून ही जाईल.

४. अंगावरचा रंग काढण्यासाठी फेस वॉशचा वापर करा.

५. रंग काढतांना तुमच्या शरीराल घासू नका. त्यामुळे तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचू शकतं.

६. रंगामुळे जर शरीरावर जळजळ किंवा खाज येत असेल तर लगेचच डॉक्टरकडे जा. 

७. रंग लावतांना चेहऱ्यावर तो हलक्या हाताने लावा. जोराने लावल्याने चेहऱ्याला नुकसान पोहोचू शकतं.

८. शरीरावर जर कोणतीही जखम असेल तर अशा व्यक्तींनी रंगपंचमी खेळू नये किंवा ती त्या जागेची काळजी घ्यावी.

९. रंगापासून तुमच्या केसांना हानी पोहोचू नये म्हणून आधीच खोबरेल किंवा बदामाचं तेल केसांना लावावे. महिलांनी केसं कपडा किंवा इतर गोष्टींनी झाकून ठेवावे.