व्हॉटसअपमध्ये दडलेल्या या सहा ट्रिक्स! तुम्हाला माहीत आहेत का?

व्हॉटसअपनं तरुणाईला भलतंच वेड लावलंय. तुमच्याही मोबाईलमध्ये व्हॉटसअप नक्कीच असेल... पण, यातील काही छुप्या ट्रिक्स तुम्हाला अजूनही माहित नसतील तर आत्ताच जाणून घ्या... 

Updated: Dec 15, 2015, 08:17 PM IST
व्हॉटसअपमध्ये दडलेल्या या सहा ट्रिक्स! तुम्हाला माहीत आहेत का? title=

मुंबई : व्हॉटसअपनं तरुणाईला भलतंच वेड लावलंय. तुमच्याही मोबाईलमध्ये व्हॉटसअप नक्कीच असेल... पण, यातील काही छुप्या ट्रिक्स तुम्हाला अजूनही माहित नसतील तर आत्ताच जाणून घ्या... 


डाटा वाचवा

डाटा वाचवा
तुमच्या व्हॉटसअपवरून इमेजेस, ऑडिओ आणि व्हिडिओ आपोआप डाऊनलोड होत असतील आणि तुमचा डाटा यामध्ये अधिक खर्च होत असेल तर हे तुम्ही बंद करू शकता. यासाठी
सेटींग > चॅट सेटिंग > मीडिया ऑटो डाऊनलोड मध्ये जा.


तुमचा मॅसेज कधी वाचला हे पाहा

तुमचा मॅसेज कधी वाचला हे पाहा
दोन निळ्या टिक्स म्हणजे तुमचा मॅसेज वाचला गेलाय, हे एव्हाना तुम्हाला ठाऊक झालं असेल पण, किती वाजता हेदेखील तुम्ही पाहू शकता. यासाठी मॅसेजवर टॅप करून दाबून ठेवा त्यानंतर (i) या आयकॉनवर क्लिक करून पाहा कधी वाचला गेलाय तुमचा मॅसेज


चॅट संग्रहित करा

चॅट संग्रहित करा
एखाद्या संभाषणामधला काही भाग तुम्हाला संग्रहीत करायचा असेल तर अगोदर ते निवडक संभाषण सिलेक्ट करा आणि Archive chat वर क्लिक करा. हे चॅटिंग तुमच्या मेमरी कार्डमध्ये सेव्ह होईल.


ग्रुप चॅटचा आवाज बंद करा

ग्रुप चॅटचा आवाज बंद करा
तुम्ही बिझी असाल आणि अशावेळी तुमचे मित्र मात्र चॅटींगमध्ये बिझी असतील तेव्हा चॅटिंगचा आवाज बंद करा... त्यामुळे तुम्हाला व्यत्यय येणार नाही.. मात्र नंतर तुम्हाला हे संभाषण आरामात वाचू शकता.


तुमचं 'लास्ट सीन' लपवा

तुमचं 'लास्ट सीन' लपवा
तुम्ही व्हॉटसअप कधी उघडलं आणि मॅसेज वाचले हे समोरच्याला कळू द्यायचं नसेल तर तुम्ही सेटींग > अकाऊंट > प्रायव्हसी > लास्ट सीन वर क्लिक करा. आणि Nobody वर क्लिक करा. यामुळे कुणीही तुमचं लास्ट सीन पाहू शकणार नाही.


आवडतं चॅट होम स्क्रीनवर पाहा

आवडतं चॅट होम स्क्रीनवर पाहा
एखादा आवडतं ग्रुप चॅटींग किंवा चॅटींग होम स्क्रीनवर तात्काळ पाहण्यासाठी हे ऑप्शन आहे.