नवी दिल्ली : एखादं मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचंय तर तुम्हीही लगेचच गूगल प्ले स्टोअरवर जाता ना... पण, आता मात्र तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल.
होय, कारण गूगल प्ले स्टोअरवरचे अनेक अॅप सध्या एका व्हायरसच्या विळख्यात सापडलेत. जवळपास ४०० अॅप 'ड्रेस कोड' मालवेअरच्या सानिध्यात आलेत.
सॉफ्टवेअर सिक्युरिटी कंपनी 'ट्रेंड मायक्रो'नं दिलेल्या माहितीनुसार, 'ड्रेस कोड' मालवेअरद्वारे युझर्सच्या नेटवर्कमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो. त्यामुळे, हॅकर्स सहजरित्या सर्व्हरवर हल्ला करून संवेदनशील डाटा हॅक करू शकतात.
मालवेअरनं प्रभावित झालेल्यांमध्ये मनोरंजन, गेम्स अॅप्सचाही समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, मालेशिअस कोड अॅप केवळ छोट्या भागांसाठी बनवले जातात. त्यामुळे त्यांना ओळखणं कठिण काम आहे. आत्तापर्यंत 'ट्रेंड मायक्रो'नं १.६६ करोड मालवेअरची ओळख केलीय.